Ad will apear here
Next
‘पानिपत’च्या कलाकारांनी पाहिले चित्रपटासाठी घडविलेल्या दागिन्यांचे प्रदर्शन
‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’ला भेट
अजित गाडगीळ, आशुतोष गोवारीकर, कृति सेनन, सुनीता गोवारीकर, डॉ. रेणू गाडगीळ व  अर्जुन कपूर.

पुणे : बहुचर्चित पानिपत या ऐतिहासिक चित्रपटासाठी पुण्यातील ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’ने आठशेपेक्षा जास्त प्रकारचे दागिने घडवले आहेत. या चित्रपटाच्या कलाकारांनी नुकतीच पु. ना. गाडगीळ आणि सन्स यांच्या औंध येथील दालनाला भेट दिली. यामध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेता अर्जुन कपूर,  कृति सेनन आणि सुनीता गोवारीकर यांचा समावेश होता. 

या वेळी ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’चे अध्यक्ष व संचालक अजित गाडगीळ, संचालिका डॉ. रेणू गाडगीळ, सीएफओ व विक्रीप्रमुख आदित्य मोडक, सतीश कुबेर व नंदू देवळे उपस्थित होते. या दागिन्यांचे प्रदर्शन औंध, हॅपी कॉलनी आणि सातारा रोड येथील दालनांमध्ये प्रदर्शन होत आहे.

‘पानिपत चित्रपटाचे दागिने हे ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’शिवाय पूर्ण होऊ शकले नसते. चित्रपटात १२८ पात्रे आहेत. प्रत्येक पात्राचा अभ्यास करून त्याला साजेसे दागिने ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’ने तयार केले. तसेच, शूटिंग चालू असताना संबंधित पात्राचे दागिने तयार नाहीत व दुसऱ्याचे दागिने तिसऱ्या पात्राला गेलेत, असे कधीही झाले नाही. यावरूनच ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’ची तयारी लक्षात येते. पारंपरिक मराठा व पेशवाई शैलीचे उत्तम कलाकुसरीचे दागिने घडविण्याचा त्यांचा हातखंडा असल्याचे दिसून येते,’ असे गौरवोद्गार आशुतोष गोवारीकर यांनी काढले.


पु. ना. गाडगीळ आणि सन्सचे संचालक व अध्यक्ष अजित गाडगीळ म्हणाले, ‘चित्रपटाचे दागिने हे महाराष्ट्रीय शैलीबरोबरच उत्तरेकडील शैलीतील असून, दागिन्यांसाठी विशेष संशोधन केले आहे. हे दागिने विविध राज्यांतील आमच्या कारागीरांनी घडविले आहेत. सोन्याबरोबर कुंदन, मोती आणि विविध रंगांच्या स्टोन्सचा वापर दागिन्यांत आहे.’      

‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’चे सीएफओ व विक्रीप्रमुख आदित्य मोडक म्हणाले, ‘चित्रपटासाठी आठशेहून अधिक विविध प्रकारचे दागिने घडविले असून, नेकलेस, बांगड्या, डोक्यातली फुले, अंगठ्या, कंबरपट्टे, कडे शिरपेच, वाक्या आदी दागिने आहेत. प्रदर्शनातील दागिन्यांवरून खरेदीसाठी ऑर्डरही देता येईल.’

विशेष प्रदर्शन
पानिपत चित्रपटात वापरण्यात आलेले पारंपरिक शैलीचे दागिने पाहण्याची संधी लोकांना मिळणार आहे. पु. ना. गाडगीळ आणि सन्सतर्फे पुण्यात औंध, हॅपी कॉलनी आणि सातारा रोड येथील दालनांसह नाशिक व सोलापूर येथेही हे प्रदर्शन होत आहे. पहिले प्रदर्शन औंधमधील पु. ना. गाडगीळ आणि सन्सच्या दालनात एक डिसेंबरपासून, तर  हॅपी कॉलनी-कोथरूड येथे आठ डिसेंबरपर्यंत आणि सातारा रोड (वाळवेकरनगर) येथील दालनात चार ते २२ डिसेंबरदरम्यान होत आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZYZCH
Similar Posts
पानिपत चित्रपटातील दागिन्यांचे प्रदर्शन पुणे : मराठा साम्राज्यासाठी महत्त्वाच्या ठरलेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर बनविण्यात आलेल्या पानिपत चित्रपटासाठी दागिने घडविण्याचा मान पु. ना. गाडगीळ आणि सन्सला मिळाला आहे. या चित्रपटात वापरण्यात आलेले पारंपरिक शैलीचे दागिने पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. पु. ना. गाडगीळ आणि सन्सतर्फे औंध, हॅपी
‘क्विकहील’ला ‘डीएससीआय’तर्फे पुरस्कार मुंबई : क्विकहील टेक्नॉलॉजीज लिमिटेडला ‘डीएससीआय एक्सलन्स अॅवॉर्ड २०१९’मध्ये नासकॉमच्या डेटा सिक्युरिटी काउन्सिल ऑफ इंडियाद्वारे (डीएससीआय) ‘सायबर सिक्युरिटी प्रॉडक्ट पायोनियर इन इंडिया’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
‘घे भरारी’तून मिळणार व्यावसायिकांना बळ पुणे : ‘व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘गोल्डन ट्युलिप इव्हेंट्स’च्या वतीने ‘घे भरारी’ या तीन दिवसीय फन-फूड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन ते पाच जानेवारी २०२० या कालावधीत शुभारंभ लॉन्स येथे सकाळी ११ ते रात्री नऊ या वेळेत हा महोत्सव होत आहे. लघु उद्योग, गृहउद्योग करणाऱ्या व्यावसायिकांना यामध्ये प्राधान्य देण्यात आले आहे
पुण्यातील ‘सिग्मापेरॉन’ ठरली सर्वोत्कृष्ट स्टार्टअप पुणे : कामाच्या ठिकाणी आपल्या विभागातील पिण्याचे पाणी संपले असेल, किंवा स्वच्छतागृहे स्वच्छ नसतील, तर आपण संबंधितांकडे तक्रार नोंदवतो आणि समस्या सोडवली जाण्यासाठी वाट पाहतो. अशा प्रसंगांमध्ये जाणारा वेळ आणि होणारी गैरसोय टाळून साध्या ‘क्यू-आर कोड’च्या माध्यमातून आपली गरज व्यवस्थापकांपर्यंत पोहोचवणाऱ्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language